जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे जवानांच्या गस्त पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. गुडविल शाळेजवळ हा हल्ला झाला.
‘गुडविल शाळा सुरु करण्यासाठी जवान मदत करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे’, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत कुपवारा जिल्ह्यात चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ५.३० वाजता चकमक सुरु झाली होती. दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते हे कळू शकलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गुरुवारपासून अमरनाथ यात्रा सुरु झाली असल्या कारणाने जम्मू काश्मीरमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 5:51 pm