उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी शनिवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असला तरी राज्याच्या पूर्वेकडील भागाला मात्र गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने झोडपून काढले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जौनपूर येथे सहा सेंमी, कटेरनियाघाट येथे ४ सेंमी, वाराणशी, बरेली आणि पद्राऊना येथे प्रत्येकी ३ सेंमी, अलाहाबाद, सलेमपूर येथे प्रत्येकी २ सेंमी पावसाची नोंद करण्यात आली.