काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आलेल्या डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा भारताची खोडी काढण्याचा प्रयत्न केला. भारताने या सगळ्या परिस्थितीतून काहीतरी धडा घेतलाच असेल. जेणेकरून भविष्यात डोकलामसारख्या घटना टाळता येतील, असे वक्तव्य करून चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताला डिवचले आहे. त्यामुळे डोकलाम मुदद्यावर दोन्ही देशांनी औपचारिक समेट केला असला, तरी आगामी काळात शाब्दिक युद्ध मात्र सुरूच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलाम प्रश्नावरून सुमारे ७० दिवस वाद सुरू होता. अखेर सोमवारी दोन्ही देशांनी या परिसरातून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३ सप्टेंबरला ब्रिक्स परिषदेसाठी चीनमध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर डोकलाम वादातील सरशी भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे भारत व चीन यांच्यातील तणाव काही प्रमाणात निवळेल, असे वाटत होते. मात्र, वांग यी यांच्या वक्तव्याने दोन्ही देशांमधील वाकयुद्ध पुन्हा छेडले जाण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्याने या परिसरात घुसखोरी केली होती. सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास भारतीय लष्कराकडून सीमाभागात घुसखोरी केलेले मनुष्यबळ व उपकरणे मागे घेण्यात आली. त्यामुळे या वादावर अखेर पडदा पडला, ही प्राथमिक गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता आम्ही आशा करतो की, भारताने यामधून काहीतरी धडा घेतला असेल. जेणेकरून भविष्यात असे प्रसंग टाळता येतील, असे वांग यी यांनी सांगितले.

भारतीय लष्करात मोठय़ा प्रमाणात सुधारणा होणार

जून महिन्यात चीनच्या सैन्याने सिक्कीम या ठिकाणी असलेल्या डोकलाम या सीमाभागात घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्यदलानेही डोकलाममध्ये सैन्य उभे केले होते. आधी चीनने सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका भारताने घेतली होती, तर भारताने आधी सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका चीनने घेतली होती. भारताने सैन्य मागे घेतले नाही तर ‘युद्धाला तयार रहावे’, ‘१९६२ सारखी अवस्था करू’ अशा वल्गनाही चीनकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, भारताने हा वाद अत्यंत संयतपणे हाताळत चीनला माघार घेण्यास भाग पाडले.

एक पाऊल मागे, पण..