भारत-पाकिस्तान सीमेवर अलीकडच्या काळात ड्रोनच्या कारवाया वाढल्या आहेत. यातील बहुतेक ड्रोनचा वापर पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यांच्याकडून केला जात आहे.रविवारी जम्मूमधील जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर दोन ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला केला. प्राथमिक तपासात याचा संबध एलईटीशी असल्याचे समोर आले आहे. जम्मूच्या हिरानगर सेक्टरमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये सुरक्षा दलाने असाच एक ड्रोन खाली पाडला होता.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी लक्ष्य केलेला ड्रोन मोकळ्या मैदानात खाली पडला होता. त्याची फॉरेन्सिक तपासणी दिल्लीतील ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (डीएफआय)ने केली होती. हा ड्रोन स्थानिक पातळीवर बनवलेला हेक्साकॉप्टर असल्याचे तपासणीत म्हटले होते. यात वापरलेले भाग दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहेत.

जम्मू विमानतळावर दहशतवादी हल्ला?; ड्रोनच्या सहाय्याने घडवण्यात आले स्फोट

हाँगकाँगमधील कंट्रोलर

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, २४ किलोच्या ड्रोनचा कंट्रोलर हा क्यूबब्लॅक होता, जो हाँगकाँगमध्ये तयार केला जातो. ड्रोनमध्ये कोणतेही काम पार पाडण्याची सूचना दिली नव्हती, तर ग्राउंड कंट्रोल सिस्टमद्वारे त्याला नियंत्रित केले गेले होते. हे सांगण्यात आले की ड्रोन उडवणाऱ्याने माहिती मिळवणाऱ्या सर्व वस्तू काढून टाकल्या होत्या.

डीएफआयने पुढे सांगितले की ते साइट ऑपरेशनपासून 10 किमी अंतरावरुन गेले होते. हे सुमारे 35 मिनिटे हवेत राहिले आणि जास्तीत जास्त 30 किलोमीटरच्या प्रवासासाठी सक्षम होते. डीएफआयमधील तज्ञांना त्यात कोणतेही बाह्य हॅकिंग किंवा कस्टम फर्मवेअर आढळले नाहीत. भागांवरील लेबलांच्या आधारे हे आढळले की ड्रोन बॅचेसमध्ये तयार केले जात आहेत.

ड्रोनमध्ये कोणतेही हॅकिंग करणारी वस्तू नाही

डीएफआयने पुढे सांगितले की तो ड्रोन साइट ऑपरेशनपासून १० किमी अंतरावरुन पुढे उडत होता. हा ड्रोन सुमारे ३५ मिनिटे हवेत राहिला आणि जास्तीत जास्त ३० किलोमीटरच्या प्रवास त्याने केला होता. डीएफआयमधील तज्ञांना त्यात कोणतेही हॅकिंग करणारी वस्तू किंवा कस्टम फर्मवेअर आढळला नाहीत. ड्रोनच्या भागांवरील लेबलांच्या आधारे आढळले की हे बॅचमध्ये तयार केले जात आहेत.

जम्मू लष्करी तळावर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु

रविवारी उडवण्यात आले होते १४ ड्रोन

उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून १४ ड्रोन उडवण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा ड्रोनने सैन्याच्या तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला होता मात्र त्याला सुरक्षा कर्मचार्‍यांनी प्रत्युत्तर दिले. रत्नुचक-कालूचक स्टेशनवर तैनात सुरक्षा जवानांनी त्या ड्रोनवर गोळीबार केल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.

पहिला ड्रोन रात्री अकराच्या सुमारास आणि दुसरा दुपारी अडीचच्या सुमारास दिसला. शोध मोहीम सुरू असून लष्करी तळाला घेराव घालण्यात आला आहे. २००२ च्या दहशतवादी हल्ल्यापासून कालूचक येथील लष्करी तळ हाय अलर्टवर आहे. त्यावेळी झालेल्या हल्ल्यात १० मुलांसह ३१ जण ठार झाले होते. तर ४८ लोक जखमी झाले, ज्यात १३ सैनिक, २० नातेवाईक आणि १५ नागरिकांचा समावेश होता.