काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज(मंगळवारी) केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांसंदर्भात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. देशात आज चार-पाच लोकं मालक बनले आहेत. काही मूठभर लोकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा होत आहे. हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत. नवे कृषी कायदे अशाप्रकारे तयार केले गेले आहेत, की ते देशातील कृषी क्षेत्र उध्वस्त करतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच, “माझ्याकडे स्वच्छ चारित्र्य आहे, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही. ते मला हात नाही लावू शकत नाही, ते मला गोळी मारू शकतात.” असं देखील राहुल गाधींनी यावेळी बोलून दाखवलं.

“मैं देश झुकने नहीं दूँगा” आठवतंय का?; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर मोदींवर हल्ला

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “आज देशासमोर एक समोर एक शोकांतिका निर्माण झाली आहे. सरकार देशाची समस्येकडे दुर्लक्ष करू इच्छित आहे व चुकीच्या सूचना देत आहे. मी एकटाच शेतकऱ्यांबाबत बोलणारा नाही, हा शोकांतिकेचा भाग आहे. हे तरूणांसाठी महत्वाचे आहे. हे वर्तमानाबद्दल नाही तर तुमच्या भविष्यासाठी आहे. हे माझे चारित्र्य आहे, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही. मी एकटा उभा राहील. मी देशभक्त आहे, मी त्यांच्यापेक्षाही जास्त कट्टर आहे. आज माझं म्हणणं ऐकू नका जेव्हा गुलाम व्हाल तेव्हा ऐकाल, मी गुलाम नाही.”

तर, जेपी नड्डा यांनी केलेल्या ट्विटचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “शेतकरी सत्य परिस्थिती जाणत आहेत. सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की राहुल गांधी काय करतात. नड्डा भट्टा पारसौलमध्ये नव्हते. माझ्याकडे एक स्वच्छ चारित्र्य आहे, मी घाबरत नाही. ते मला हात लावू शकत नाहीत, मला गोळी मारू शकतात हा वेगळा मुद्दा आहे.”

आणखी वाचा- राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेला नड्डांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राहुल गांधी यांनी पत्रकारपरिषदेच्या सुरुवातीस कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर ‘खेती का खून तीन काले कानून’ असं नाव असलेली एक पुस्तिका प्रसिद्ध केली. यावेळी ते म्हणाले “आजपर्यंत शेतीचा फायदा शेतकरी व मजुरांना मिळायचा. मात्र नव्या कृषी कायद्यांमुळे चार-पाच लोकांच्या हातात संपूर्ण देशाच्या शेतीचा आराखडा जाईल.काही मोजक्या लोकांनाच फायदा मिळवून दिला जात आहे.”