भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सात जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर बरेली येथून अलाहाबादकडे जात असताना अटारिया जिल्ह्य़ानजीक मणिपुरवा येथे ते कोसळले. हेलिकॉप्टरला अचानक आग लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर कोसळले त्यावेळी त्याला अग्निज्वाळांनी लपेटले होते. हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यांचे पथक सीतापूरला रवाना झाले आहे. विंग कमांडर, स्क्वाड्रन लीडर, ज्युनियर वॉरंट ऑफिसर, सरजट व एलएसी, इतर दोन कनिष्ठ अधिकारी यात मरण पावले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सात ठार
भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सात जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर बरेली येथून अलाहाबादकडे जात असताना अटारिया जिल्ह्य़ानजीक मणिपुरवा येथे ते कोसळले

First published on: 26-07-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iaf dhruv chopper crashes in up all seven on board feared dead