News Flash

ICSE बोर्डाचा दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्या निर्णय!

जूनच्या पहिल्या आठवड्या नव्या तारखांची घोषणा होणार

‘करोनापूर्व काळा’तील संग्रहित छायाचित्र

देशात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस करोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नुकतच केंद्र सरकारने सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर आता ICSE बोर्डाकडून देखील दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जून महिन्यातील पहिल्या आठवड्या परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. ४ मे पासून ही परीक्षा सुरू होणार होती.

Coronavirus : NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलली

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEETPG – 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय़ घेतलेला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. असं ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली होती.

मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 7:08 pm

Web Title: icse board exams for classes 10 and 12 have been deferred msr 87
Next Stories
1 Zoom Call: …कॅमेरा ऑन झाला अन् खासदार चक्क नग्नावस्थेत दिसले
2 नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी इंग्लंडचा हिरवा कंदील
3 केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X