जर तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत पॅनकार्ड व आधारकार्ड जोडणी केली नाही तर, तुमचे पॅनकार्ड वापरात राहणार नाही. या अगोदर असा नियम होता की जर ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅनकार्ड व आधार कार्ड जोडणी केली नाहीतर तुमचे पॅनकार्ड अवैध समजले जाईल. म्हणजेच तुमच्याकडे पॅनकार्ड नाही असे मानले जाईल. तर आता ते वापरात नसल्याचे मानले जाणार आहे. म्हणजेच १ ऑक्टोबरपासून जोपर्यंत तुम्ही पॅनकार्डला आधारकार्डशी जोडत नाहीत. तोपर्यंत तुम्ही प्राप्तिकर, गुंतवणूक किंवा कर्ज आदींशी निगडीत कोणतीही कामं करता येणार नाही.

केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डशी जोडण्याची मुदत दिली आहे व हे आवश्यक केले आहे. त्यामुळे जर पॅन-आधार जोडणी केलेली नसेल तर तुम्ही ती करून घेणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत बँक खाते, पॅनकार्डची आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. जे कोणी असे करणार नाही त्यांचे पॅनकार्ड अवैध मानले जाणार आहे.