News Flash

वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण; लग्नमंडपाऐवजी गाठलं पोलीस स्टेशन

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रामपुरा गावात एका नवरदेवाला निर्दयपणे मारहाण करण्यात आली

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रामपुरा गावात एका नवरदेवाला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्याचा दोष इतका होता की, वरात निघण्यापुर्वी तो घोड्यावर बसून कुलदेवताचे दर्शन घेण्यास एका गल्लीतून जात होता. त्या गल्लीत एका घरात शोकाकूल वातावरण होते.

शोकाकूल वातावरणात घरासमोरून नवरदेव जात असल्यामुळे त्यांना आवडले नाही. त्यामुळे नवरदेव असलेल्या बलराम पटेल यांना गावातील मुकेश यादव, चंदन यादव, रानू यादव यांनी रोखले. आमचे कुटुंब दुख:त असतांना तुम्ही आनंद कसा साजरा करत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाले. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मुकेश यादव आणि चंदन यादव यांनी नवरदेवाला लाता बुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर नवरदेव बलराम पटेल याने लग्नाची मिरवणूक सासरच्या घरी न नेता नातेवाईकांसह शेट पोलीस स्टेशन गाठले. तसेच आरोपी चंदन यादव, मुकेश यादव आदींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 12:48 pm

Web Title: in madhya pradesh groom was severely beaten by people on the streets srk 94
Next Stories
1 Covid 19: सिपला औषध कंपनीचं आरटी-पीसीआर टेस्ट किट आजपासून विक्रीला
2 “लक्षद्वीपचा दुसरा काश्मीर तयार करताय का?,” गोमांस बंदीसहित अनेक निर्णयांमुळे वाद
3 “मोदींचा हिंदुत्ववाद, विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे करोनाविरुद्धची देशाची लढाई आणखीन कठीण झाली”
Just Now!
X