रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल त्यांनी त्यांच्या संवेदनाही व्यक्त केल्या. इतकंच नाही तर दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत आहे असं वचनही त्यांना दिलं. पुलवामाचा हल्ला ही दुःखद घटना असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे.
In phone call Putin Modi, conveys condolences on Pulwama terrorist attack
Read @ANI story | https://t.co/FqwxipGJR9 pic.twitter.com/cY37BUfTF8— ANI Digital (@ani_digital) February 28, 2019
दहशतवादाविरोधात भारत जी कारवाई करतो आहे त्याला रशियाने साथ दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांनी फोनवरून केलेल्या चर्चेत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान या वर्षाच्या शेवटी व्लादिवोस्तोक या ठिकाणी होणाऱ्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सहभागी व्हावं असं निमंत्रणही पुतिन यांनी दिलं.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून करण्यात आला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघानेही या घटनेचा निषेध नोंदवला. पुलवामाचा हल्ला आणि चाळीस जवान शहीद होणे ही बाब निश्चितच देशासाठी दुःखाची आहे असं म्हणत पुतिन यांनी त्यांच्या संवेदना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्यक्त केल्या. तसेच दहशतवादाशी लढा देताना रशियाचीही भारताला साथ आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.