News Flash

चीनसह पाकिस्तानचेदेखील भारताला कडवे सागरी आव्हान, जाणून घ्या भारत काय करणार

हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानला सरळसरळ टक्कर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे.

हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानला सरळसरळ टक्कर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. यासाठी भारत फ्रांसकडून आणखी तीन स्कॉर्पेन पाणबुडी खरेदी करणार आहे. भारताच्या सहा पाणबुडी माझगांव डॉकमध्ये उभ्या असून, नव्या श्रेणीतील सहा स्टेल्थ पाणबुडींसाठी पुढील वर्षापर्यंत निविदा जारी करण्यात येईल. चीन आणि पाकिस्तान दोघे मिळून भारताला हिंद महासागरात घेरण्याची तयारी करत असल्याने भारताकडून ही पावले उचलली जात आहेत. चीनच्या नौसेना सामर्थ्याबाबत सर्व जगाला कल्पना असली, तरी भारताच्या तुलनेत पाकिस्तानदेखील फार दूर नसल्याचे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अलिकडेच पाकिस्तानने चीनला ८ अॅडव्हान्स डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडींची ऑर्डर दिली आहे.

काय आहे भारताचे लक्ष?

या पाणबुडी खरेदीमागे अंदमान आणि निकोबारजवळील मलक्का या अरुंद सागरी पट्ट्याचे रक्षण करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. या भागात आपले अस्तित्व वाढविण्याचा चीन प्रयत्न करत आहे. गेल्या काही काळापासून हिंद महासागरातील चीनच्या आणविक पाणबुडींचा वावर भारतासाठी फार चिंतेचा विषय बनला आहे. याकारणासाठीच अंदमान आणि निकोबारमध्ये भारतदेखील आणविक पाणबुडी तैनात करू इच्छितो. जाणकारांच्या मतानुसार भारताला मलक्का स्ट्रेटजवळच्या सागरी सीमेवरील चेक पॉईंटची सुरक्षा आणि गस्त या दोन्हीवर भर द्यावा लागणार आहे. मलक्का स्ट्रेट इंडोनेशिया आणि मलेशिया यांच्या मधला भाग आहे. हा भाग हिंद आणि प्रशांत महासागराला जोडतो.

आकडे काय सांगतात?

सध्या भारताकडे १३ पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहेत. यातील दहा पाणबुडी पंचवीस वर्षाहून अधिक जुन्या आहेत. आयएनएस चक्र ही रशियाकडून भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. चक्रमध्ये आणविक क्षमतेचा अभाव आहे. तर चीनकडे ५१ सामान्य आणि ५ आणविक पाणबुडी आहेत. याशिवाय चीन पाच नवीन जेआयएन क्लास न्यूक्लिअर पाणबुडी आपल्या ताफ्यात सामावून घेणार आहे. यामध्ये ७४०० किलोमीटरपर्यंत मारा करणारे जेएल-२ क्षेपणास्त्र तैनात असेल.

काय आहे भारताची तयारी?

माझगांव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आलेली पहिली स्वदेशी स्कॉर्पेन पाणबुडी एप्रिलमध्ये पाण्यात उतरविण्यात आली. या पाणबुडीची समुद्रात चाचणी सुरू असून, सप्टेंबर २०१६मध्ये तिला भारतीय नौसेनेच्या हवाली करण्यात येईल. याशिवाय सहा पाणबुडी फ्रांसबरोबरच्या तांत्रिक कराराद्वारे निर्माण करण्यात येत आहेत. ज्या २०१८ पर्यंत निर्माण होतील.

स्कॉर्पेनची ताकद

स्कॉर्पेनबद्दल बोलायचं झाल्यास ही एक अँटी सबमरीन आहे. सुरुंग लावणे, गुप्त माहिती गोळा करणे आणि टेहाळणी करण्याबरोबरच युध्दातील अनेक महत्वाच्या कार्यात ती भूमिका बजावू शकते. तिची लांबी २१६ फूट असून, रुंदी २० फूट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 2:06 pm

Web Title: india finalizing plans to order three more scorpene submarines
टॅग : China,Pakistan
Next Stories
1 इंग्रजी शिक्षण राष्ट्रभक्ती शिकवू शकत नाही- सरसंघचालक
2 काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात चार जवान जखमी
3 भारत-पाक चर्चेनंतर सुषमा स्वराज मंगळवारी पाकिस्तानला जाणार
Just Now!
X