06 March 2021

News Flash

भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये चीनला शिकवला धडा, PLA चे २० सैनिक जखमी

भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर....

पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे. इंडियाने टुडेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.

भारताच्या बाजूला चार जवान जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असतानाही, भारतीय जवानांनी चीनचा घुसखोरीचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. पीएलएच्या सैनिकांना मागे ढकलले. चकमक झालेल्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे.

सिक्कीकमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असले, तरी भारतीय सैन्याचे चीनच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही महिन्यापूर्वी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात पॉईंट १४ जवळ दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. पूर्व लडाख सीमेवरील वाद अद्यापी मिटलेला नाहीय. नऊ फेऱ्यांच्या चर्चेनंतरही काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सिक्कीममधील या घटनेमुळे आता पूर्व लडाखमध्येही तणाव वाढू शकतो.

चीनकडून पुन्हा दगाबाजी, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही कारण…
पूर्व लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मध्यंतरी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने काही उपाय सुचवले होते. पण आता स्वत: चीननेच त्याचे उल्लंघन केले आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनने आपली स्थिती भक्कम केली आहे. नियंत्रण रेषेजवळ संघर्ष असलेल्या भागात शांतपणे आणि टप्याटप्याने सैनिकांची संख्या सुद्धा वाढवली आहे. चार महिन्यापूर्वी चीननेच स्वत: संघर्ष असलेल्या भागांमध्ये दोन्ही बाजूंनी सैनिक संख्या वाढवणं टाळलं पाहिजे, असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 11:12 am

Web Title: india foils chinas attempt to transgress across border at naku la in sikkim pla soldiers injured dmp 82
Next Stories
1 Coronavirus – देशभरात २४ तासांत १३१ रुग्णांचा मृत्यू , १३ हजार २०३ नवे करोनाबाधित
2 दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला; पगडीही खेचण्यात आली
3 धक्कादायक! एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार
Just Now!
X