News Flash

भारत हे आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे -डिसोझा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे वक्तव्य गोवा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता गोव्याचे

| July 26, 2014 12:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे वक्तव्य गोवा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी त्यावरही कडी केली आहे. भारत हे हिंदू राष्ट्रच असून तेच अस्तित्व कायम राहील, असे डिसोझा यांनी म्हटले आहे.
भारत हे नि:संशय हिंदू राष्ट्रच आहे आणि त्याचे हेच अस्तित्व कायम राहील, असे डिसोझा म्हणाले. मगो पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. ढवळीकर यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 12:41 pm

Web Title: india is already a hindu nation goa deputy cm
Next Stories
1 चव्हाणांना पाठविलेल्या नोटिशीबाबत स्पष्टीकरण नाही – निवडणूक आयोग
2 उत्तराखंड पोटनिवडणुकीत काँग्रेसची मुसंडी
3 मोदी सरकारचे ‘वो साठ दिन’
Just Now!
X