देशभरात मागील २४ तासांमध्ये १९ हजार २९९ जण कोरनामुक्त झाले आहेत. तर, १६ हजार ३११ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून १६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ४ लाख ६६ हजार ५९५ वर पोहचली आहे.

सध्या देशात २ लाख २२ हजार ५२६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, आतापर्यंत १ कोटी ९२ हजार ९०९ जणांनी करोनावर मात केली आहे. याशिवाय, १ लाख ५१ हजार १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने हे एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात १० जानेवारीपर्यंत १८,१७,५५,८३१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाख ५९ हजार २०९ नमून्यांची काल तपासणी झाली असल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळालेली आहे.

दरम्यान, देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून, जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींची आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील करोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची कितपत तयारी झालेली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.