देशात मागील २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासांत देशभरात २० हजार ५५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर २६ हजार ५७२ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, याच कालावधीत २८६ रुग्णाचा मृत्यू झाल्याचीह नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी २ लाख ४४ हजार ८५३ वर पोहचली आहे.

सध्या देशात २ लाख ६२ हजार २७२ अॅक्टिव्ह केसेस असून, ९८ लाख ३४ हजार १४१ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत १ लाख हजार ४३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, जगभरात बदलेल्या विषाणूचा कहर सुरू असला, तरी अद्याप नव्या करोना विषाणूचा एकही रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळलेला नसल्याची माहिती अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. ब्रिटनमधून येणारी विमाने देशात सर्वात अगोदर महाराष्ट्राने थांबविली, त्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला, असेही टोपे यांनी सांगितले आहे.

नव्या करोना विषाणूचा राज्यात एकही रुग्ण नाही

करोनामुळे संपूर्ण जगभरात १९ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेते आपातकालीन प्रमुख मायकल रायन यांनी करोना संकट हे फार मोठं नव्हतं मात्र सर्वांना खडबडून जागं करणारी परिस्थती होती असं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मायकल रायन यांनी हा सर्वांना भविष्यात येऊ शकणाऱ्या संकटाचं गांभीर्य दर्शवणारा इशारा होता असं म्हटलं आहे.