News Flash

देशात ६८ लाख नागरिक करोनामुक्त, २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना डिस्चार्ज

२४ तासात देशभरात एकूण ७०२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू.

संग्रहीत छायाचित्र

देशात करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची गती मंदावली आहे. पण अजूनही हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. मागच्या २४ तासात देशात ५५ हजार ८३८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ७७ लाख सहा हजार ९४६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. २४ तासात देशभरात एकूण ७०२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.

करोनामुळे आतापर्यंत देशात १ लाख १६ हजार ६१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या करोनाच्या सात लाख १५ हजार ८१२ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ६८ लाख ७४ हजार ५१८ रुग्ण करोनामुक्त झालेत.

मागच्या २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना हॉस्पिटमधून डिस्चार्ज मिळाला आहे. बुधवारी देशात ५४ हजार ४० नवे करोना रुग्ण आढळले होते, तर ७१७ मृत्यूंची नोंद झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 11:02 am

Web Title: india total covid 19 cases surge to 77 lakhs dmp 82
Next Stories
1 चिनी रणगाडे ‘नाग’च्या रेंजमधून नाही सुटणार, क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी
2 Happy Birthday: शेअर ब्रोकर अमित शाह ते शहेनशाह
3 ऑक्सफर्डच्या करोना लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू
Just Now!
X