स्वदेशात निर्मित अर्जुन एमके- १ ए हा लढाऊ रणगाडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लष्कराच्या सुपूर्द केला. दक्षिणेने तयार केलेला हा रणगाडा देशाच्या उत्तर सीमांचे संरक्षण करणार असून, हे भारताच्या एकतेच्या भावनेचे उदाहरण आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
स्वदेशात निर्मित आणि विकसित केलेल्या व संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने उत्पादित केलेल्या या अत्याधुनिक रणगाड्याची मानवंदनाही चेन्नईत झालेल्या एका समारंभात मोदी यांनी स्वीकारली. पंतप्रधानांनी नंतर या रणगाड्याची एक प्रतिकृती लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सोपवली.
‘‘या रणगाड्यात स्वदेशी दारूगोळ्याचा वापर केला जातो. तमिळनाडू हा यापूर्वीच देशाचा ऑटो उत्पादन हब बनला आहे. आता हे राज्य देशाचा रणगाडा उत्पादन हब म्हणून आकाराला येत असल्याचे मला दिसते,’’ असे त्यांनी नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 1:39 am