26 February 2021

News Flash

जैश-ए-मोहम्मद अजून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे. संभाषणावरुन जम्मू किंवा जम्मू काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दर्शवला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तयारीचा व्हिडीओ जारी करणार आहे. या व्हिडीओत प्रामुख्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार अली अहमद दारवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. 20 वर्षीय अली अहमद दार यानेच स्फोटकांनी भरलेली आपली व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात नेऊन धडक दिली होती. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले. या व्हिडीओचा आधार घेत जैश-ए-मोहम्मद काश्मीरमधील तरुणांना संघटनेत सामील करुन घेत आत्मघाती हल्ल्यांसाठी वापर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांमधील संभाषण हे जाणुनबुजून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मात्र गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला असल्या कारणाने त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व काळजी घेत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 8:46 am

Web Title: intelligence input says jaish e mohammad planning another major attack
Next Stories
1 भीषण ! बांगलादेशमध्ये आगीत होरपळून ५६ जणांचा मृत्यू
2 मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, UN मध्ये पाक विरोधात ४० देश एकवटले
3 Kulbushan Jadhav case : अभद्र भाषेवर भारताने पाकिस्तानला खडसावले
Just Now!
X