News Flash

IPL संघांचे मालक आणि खेळाडुंकडून जास्त टॅक्स घ्या; भाजप खासदाराची मागणी

अनेकजण इतक्या मोठ्या रकमांच्या लायकीचे नाहीत.

Babul Supriyo : आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा वरचष्मा राहिलेला पहायला मिळाला. प्रत्येक संघ मालकांनी अखेरच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यामध्ये रस दाखवला. या कारणामुळे अनेक स्थानिक क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशीच्या लिलावात कोट्यवधींच्या बोली लागलेल्या पहायला मिळाल्या.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या हंगामातील खेळाडुंच्या लिलाव प्रक्रियेला शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी संघ मालकांनी अनेक खेळाडुंना कोटयावधी रुपयांच्या बोली लावून खरेदी केले. यावरून भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या लिलावातील बड्य़ा रकमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघाचे मालक आणि खेळाडुंवर जास्त कर आकारण्यात आला पाहिजे, असे ट्विट केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी लिलावात कोट्यावधी रुपयांचा भाव मिळालेले अनेक खेळाडू इतक्या मोठ्या मोबदल्याच्या लायकीचेही नाहीत, असे म्हटले आहे.

Next Stories
1 IPL 2018 AUCTION: बेन स्टोक्स महागडा खेळाडू, अनुभवी खेळाडूंना वगळून संघमालकांची तरुणांना पसंती
2 पॅरालिम्पिकमधल्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्याचा गौरव, जाणून घ्या कोण आहेत मुरलीकांत पेटकर?
3 इरफान पठाणचा बडोद्याला रामराम?, नवीन हंगामात जम्मू-काश्मिरकडून खेळण्याचे संकेत
Just Now!
X