भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जी माधवन नायर यांनी युपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. चांद्रयान-२ लॉन्च करण्याची मूळ योजना २०११ मध्ये आखण्यात आली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने निर्णय घेण्यात उशीर केल्याने चांद्रयान-२ च्या लॉन्चिंगला सात वर्ष उशीर झाला असल्याचा आरोप जी माधवन नायर यांनी केला आहे.

स्वतःच्या अंतराळ स्थानक निर्मितीची भारताची योजना : इस्रो

नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर अशा योजनांवर जोर देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये चांद्रयान-२ आणि गगनयान यांचाही समावेश होता. आणि आता तर वकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन आखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पहिल्या मानवरहित मिशन चांद्रयान-१ ची जबाबदारी जी माधवन नायर यांनी पार पाडली होती. २२ ऑक्टोबर २००८ रोजी हे लॉन्चिंग झालं होतं. २००३ ते २००९ दरम्यान ते इस्त्रोचे प्रमुख होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ऑगस्ट २००९ रोजी चांद्रयान-२ ला २०१२ च्या अखेर लाँच करण्याचना निर्णय घेण्यात आला होता. पण काँग्रेसप्रणीत युपीए सरकारकरडून घेण्यात आलेल्या निर्णयामुंळे उशीर झाला.

जी माधवन नायर यांनी आरोप केला आहे की, ‘निवडणुकीत फायदा घेता यावा यासाठी युपीए सरकार २०१४ लोकसभा निवडणुकीआधी मंगळयान मिशन घेऊन आलं होतं’. मंगळयान मिशन नोव्हेंबर २०१३ मध्ये युपीएच्या कार्यकाळात लॉन्च झालं होतं. पण हे मंगळयान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात (सप्टेंबर २०१४) मगंळावर पोहोचलं.