24 January 2021

News Flash

जगमोहन, अनुपम खेर, अजय देवगण यांना पद्म पुरस्कार प्रदान

समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना सोमवारी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

| March 29, 2016 02:21 am

रिलायन्स उद्योगाचे संस्थापक दिवंगत धीरुभाई अंबानी यांना जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांनी सोमवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी अभिनेते अनुपम खेर व अजय देवगण यांनाही सन्मानित करण्यात आले.

रिलायन्स उद्योगाचे संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी, माजी राज्यपाल जगमोहन, अभिनेते अनुपम खेर व अजय देवगण आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना सोमवारी पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी ५ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण आणि ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेल्या ५६ विख्यात व्यक्तींमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर, प्रख्यात नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती, माजी महालेखापाल विनोद राय, लोकगीत गायिका मालिनी अवस्थी, कृषी क्षेत्रातील ज्ञानी व्यक्तिमत्त्व सुभाष पालेकर आणि प्रख्यात शेफ मोहम्मद इम्तियाझ कुरेशी यांचा समावेश होता.
पती धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वीकारला. रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी व रिलायन्स एडीएचे अध्यक्ष अनिल अंबानी या दोन मुलांसह त्यांच्या कुटुंबातील निकट सदस्य यावेळी उपस्थित होते. अमेरिकेत स्थायिक अर्थतज्ज्ञ अविनाश दीक्षित, जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल जनमोहन, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रसारकर्त्यांपैकी एक असलेल्या यामिनी कृष्णमूर्ती व श्री श्री रविशंकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यांचाही समावेश..
पद्मभूषण पुरस्कार स्वीकारणाऱ्यांमध्ये प्रख्यात वास्तुविशारद हफीझ काँट्रॅक्टर, अजित वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक ब्रजिंदर सिंग हमदर्द, चित्रपट अभिनेते अनुपम खेर, बांधकाम क्षेत्रातील बडे प्रस्थ व शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष पालनजी शापूरजी मिस्त्री, बॅडमिंटन तारका सायना नेहवाल, माजी महालेखापाल विनोद राय आणि हैदराबादच्या एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीचे अध्यक्ष डी. नागेश्वर रेड्डी यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 2:21 am

Web Title: jagmohan anupam kher ajay devgan honoured with padma awards
टॅग Anupam Kher
Next Stories
1 मोदींच्या लाहोर भेटीवर पाक लष्कर नाराज
2 पठाणकोटला भेट देण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांना मज्जाव – संरक्षणमंत्री
3 आसाममधील घुसखोरी थांबविण्यात काँग्रेस असमर्थ -अमित शहा
Just Now!
X