07 March 2021

News Flash

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद, महिलेचाही मृत्यू

शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून पुलवामा येथेही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक नागरिक जखमी झाला आहे.

कुपवाडा येथील कोचलू गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जवान शहीद झाला. दहशतवादी घटनास्थळावरुन पळ काढण्यात यशस्वी झाल्याचे समजते. शहीद जवानाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

दुसरीकडे पुलावामा जिल्ह्यातील अवंतिपूरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. यात एक नागरिक जखमी झाला. तर याच जिल्ह्यातील द्रूवगाव येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 4:14 pm

Web Title: jammu and kashmir soldier martyred woman killed gunbattle with terrorists kupwara pulwama
Next Stories
1 काळा रंग आणि मोठे दात असल्याचे सांगत सुनेचा हुंड्यासाठी छळ
2 वाजपेयींचे स्वप्न मोदी सरकार आणि इम्रान खान यांनी पूर्ण करावे : फारुख अब्दुल्ला
3 देशप्रेम : हजयात्रेमध्ये निवृत्त पोलिसानं फडकावला तिरंगा
Just Now!
X