News Flash

जपानचा बोलका यंत्रमानव अंतराळात

जगातील पहिलाजगातील पहिला बोलका यंत्रमानव जपानने अखेर अंतराळात पाठवला आहे. त्याचे नाव ‘किरोबो’ असून जपानी अंतराळवीरांना अवकाशात एकटे वाटू नये यासाठी तो त्यांचा सहकारी बनून

| August 6, 2013 12:51 pm

जगातील पहिलाजगातील पहिला बोलका यंत्रमानव जपानने अखेर अंतराळात पाठवला आहे. त्याचे नाव ‘किरोबो’ असून जपानी अंतराळवीरांना अवकाशात एकटे वाटू नये यासाठी तो त्यांचा सहकारी बनून राहणार आहे. जपानच्या एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तानेगाशिमा या दूरस्थ बेटावरून ‘एच २ बी’ या अग्निबाणाच्या मदतीने किरोबो हा यंत्रमानव पाठवण्यात आला. तो यानाच्या मालवाहू भागात ठेवण्यात आला होता. त्याच्या समवेत अंतराळवीरांसाठी अन्न, पाणी व इतर वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. जपानचा कोइची वाकाटा हा अंतराळवीर याच वर्षी अवकाशात जाणार आहे, त्याला सोबत करण्याचे काम हा यंत्रमानव करणार आहे.
किरोबो यंत्रमानवाच्या शून्य गुरूत्वाला अनेक चाचण्या घेण्यात आल्या असून उड्डाणापूर्वीही वेगळ्या सुरक्षा चाचण्या घेण्यात आल्या.
 किरोबो यंत्रमानवाचे नाव किबो व रोबोट या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून देण्यात आले आहे. किरोबोचा एक सहकार यंत्रमानव हा पृथ्वीवरून त्याच्या संपर्कात राहील, त्याचे नाव मिराटा असे आहे. मानव-यंत्रमानव यांच्यात अंतराळामध्ये होणाऱ्या संवादात्मक बाबींसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या किबो-रोबोट या प्रकल्पाचा तो भाग आहे.
किरोबो व मिराटा हे दोन यंत्रमानव टोकियो विद्यापीठाने तयार केले आहेत. त्यांना आवाज ओळखण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर त्यात कॅमेरा, भावनांची ओळख पटवणारे सॉफ्टवेअर, नैसर्गिक भाषा संस्करण अशा सुविधा त्यात आहेत.

बोलका यंत्रमानव कसा आहे ?
किरोबो हा बोलका यंत्रमानव ३४ सेंटिमीटर उंचीचा असून तो बराच काळ दूर राहणाऱ्यांना भावनिक आधार देतो. बऱ्याच मोठय़ा अंतराळ वास्तव्यात तो अंतराळवीरांशी बोलेल.तो जपानी बोलतो व जपानचे अंतराळवीर कोइची वाकाटा हे नोव्हेंबरमध्ये अंतराळ स्थानकात जातील तेव्हा तो त्यांचा सहकारी असेल. मानव व यंत्रमानव गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतील असे जग आपल्याला तयार करायचे आहे, असे किरोबो यंत्रमानवाने या प्रकल्पाच्या प्रारंभ प्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 12:51 pm

Web Title: japan launches talking humanoid robot into space
टॅग : Robot,Space
Next Stories
1 ‘जमात’वरील बंदी बांगलादेशच्या न्यायालयाकडून कायम
2 ‘नीट’च्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका
3 तेलंगण विरोध, छोटय़ा राज्यांच्या मागणीवरून संसदेचे कामकाज बाधित
Just Now!
X