01 October 2020

News Flash

पोलिसांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर माझ्या एन्काऊंटरची चर्चा; जिग्नेश मेवाणींचा आरोप

जिग्नेश मेवाणींनी केली सुरक्षेची मागणी

जिग्नेश मेवानी

ADR Police & Media या व्हॉट्स अॅप ग्रुपवरची चर्चा व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आपल्या बचाव आणि सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. या ग्रुपमधील पोलीस अधिकाऱ्यांचे संभाषण व्हायरल झाल्यावर जिग्नेश मेवाणींनी असा आरोप केला आहे की हे पोलीस अधिकारी माझ्या एन्काऊंटरची चर्चा करत होते. त्यामुळे मला संरक्षणाची आवश्यकता आहे असेही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले आहे.

ADR Police & Media या व्हॉट्स अॅप ग्रुपवर दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. एका व्हिडिओत नेत्याचा पोशाख घातलेला एक माणूस पोलिसांना मारतो आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या एका एन्काऊंटरप्रकरणी करण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहेत. हे दोन्ही व्हिडिओ अहमदाबाद ग्रामीणचे डीएसपी यांच्या मेसेजनंतर अपलोड करण्यात आले आहेत. जी माणसे पोलिसांचे बाप असल्याचा दावा करतात, पोलिसांना ‘लखोटा’ असे चिडवतात आणि पोलिसांचा व्हिडिओ काढतात त्यांच्यासोबत असेच घडते. गुजरात पोलीस; असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले असल्याचेही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले आहे.

या मेसेजला थम्स अप इमोजीने उत्तर देत अहमदाबाद ग्रामीण एसपीनेही फॉलो केले होते. तसेच हा मेसेज इतर ग्रुप्सवरही फॉरवर्ड करण्यात आला. मात्र  या मेसेजचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढला गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही धमकीही नव्हती किंवा खासगी मेसेजही नव्हता. मात्र हा मेसेज पोहचल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पोलीस माझे एन्काऊंटर करण्याच्या तयारीत आहेत असा आरोपही केला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला फोनवर दिलेल्या प्रतिक्रियेत हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले आहे. पोलीस मला संकेत देत आहेत की तुमचा एन्काऊंटर होऊ शकतो. हे सगळे प्रकरण मी डीजीपी, गृहमंत्री आणि गृह सचिवांपुढे मांडणार आहे असेही मेवाणी यांनी स्पष्ट केले. दरम्यान १८ फेब्रुवारीला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जिग्नेश मेवाणी पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. जिग्नेश मेवाणींना अहमदाबाद बंद सुरु होण्याआधी अटक करण्यात आली होती त्यावेळी मेवाणी पोलिसांना उद्देशून म्हटले होते की यह तुम्हारे बाप की जगह नहीं. तसेच साध्या वेशातील पोलिसांना लखोटा असे म्हणत जिग्नेश मेवाणींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र काही दिवसातच दोन व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 10:25 am

Web Title: jignesh mevani fears for safety after whatsapp chat of senior cops goes viral
Next Stories
1 राहुल गांधी माझे नेते नाहीत; प्रियंका गांधींनी राजकारणात यावे-हार्दिक पटेल
2 बॉम्बस्फोटाने सोमालिया हादरलं; १८ जण जागीच ठार, २० जखमी
3 एकत्रित निवडणुका घेणे अवघड – प्रणब मुखर्जी
Just Now!
X