13 December 2018

News Flash

पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद

या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

Pakistan firing at LoC : राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद झाले. ते अवघ्या २८ वर्षांचे होते. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर धुळे जिल्ह्यातील खलाने गावावर शोककळा पसरली आहे.

सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. या दरम्यान लान्स नायक योगेश भदाणे हे जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

First Published on January 13, 2018 8:02 pm

Web Title: jk indian soldier lance naik yogesh muralidhar bhadane killed in pakistan firing at loc