जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्याविरुद्धचा खटला म्हणजे देशद्रोह नाही. भारत हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दररोज काहीतरी वक्तव्य केले जाते, त्यामुळे आपल्याला बाधा झाली आहे का, केवळ घोषणाबाजी करून आपल्याला काय फरक पडणार आहे, आपल्याला हे हास्यास्पद वाटते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फैजनुद्दीन यांनी व्यक्त केले आहे. न्या. फैजनुद्दीन यांनी न्या. ए. एस. आनंद यांच्यासह देशद्रोहाच्या खटल्यात १९९५ मध्ये एक ऐतिहासिक निकाल दिला होता.

 

नवी दिल्ली :कन्हैयाची कोठडी वाढवण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली. त्यांनी सादर केलेल्या अहवालात असा दावा केला की, कन्हैय्याकुमार हा केवळ घोषणाबाजीतच सामील होता असे नाही तर जेएनयूमधील कार्यक्रमांच्या आयोजकांत तो होता.

 

नवी दिल्ली : घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामील असलेल्या उमर खालीद व अनीरबन भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे मंगळवारी मध्यरात्री शरणागती पत्करली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दोघांची चौकशी करून नंतर अटक करण्यात आली.