04 June 2020

News Flash

कन्हैया कुमारचा न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज; ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला. कन्हैयाने अपवादात्मक परिस्थितीचे कारण देत जामीन देण्याची विनंती केली आहे.

Kanhaiya Kumar : कन्हैया कुमारच्या सुटकेच्या मागणीसाठी जेएनयूतील विद्यार्थ्यांकडून आज मंडी हाऊस ते जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला. कन्हैयाने अपवादात्मक परिस्थितीचे कारण देत जामीन देण्याची विनंती केली आहे. उद्या या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होईल. यावेळी भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी न्यायालयात कन्हैयाची बाजू मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कन्हैया कुमारच्या सुटकेच्या मागणीसाठी जेएनयूतील विद्यार्थ्यांकडून आज मंडी हाऊस ते जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे.
students_759_jnu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2016 4:23 pm

Web Title: kanhaiya kumar moves supreme court for bail jnu students march for his release
Next Stories
1 २५१ रुपयांचा स्वस्त स्मार्टफोन संशयाच्या भोवऱयात, ‘फ्रीडम २५१’चे संकेतस्थळ क्रॅश
2 देशातील विद्यार्थ्यांवर संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न – राहुल गांधी
3 पतीच्या अंत्यसंस्कारासाठी तिने मुलांना गहाण ठेवले…
Just Now!
X