26 November 2020

News Flash

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट

"लवकरच मुख्यमंत्री बदलणार"

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा. (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

एच.डी. कुमारस्वामी यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या बी.एस. येडियुरप्पा यांचं पद धोक्यात आलं आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता असून, भाजपाच्याच आमदारानं हा गौप्यस्फोट केला आहे. “लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येणार असून, पंतप्रधान मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल असं म्हटलं आहे”, असा दावा भाजपाच्या आमदारानं केल्यानं पक्षातील गृहयुद्ध चव्हाट्यावर आलं आहे.

भाजपाचे आमदार बसंगौडा पी. यतनाल यांनी पक्षाच्या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केल्यानं कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बसंगौडा कार्यक्रमात बोलताना म्हणाले,”बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर राज्यातील बहुसंख्य वरिष्ठ नेते नाराज आहेत, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असं सांगितलं आहे. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले. उत्तर कर्नाटकातील जनतेनं १०० आमदार दिले, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असं सांगत बसंगौडा यांनी गौप्यस्फोट केला.

एच.डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळल्यानंतर बी.एस. येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, आता येडियुरप्पा यांना पक्षातून विरोध होताना दिसत आहे. भाजपाच्या आमदारानेच हा विरोध जाहीरपणे बोलून दाखवला असून, पंतप्रधान मोदींचा हवाला दिल्यानं कर्नाटकातील सत्तानाट्य पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याची चिन्हं आहेत. त्याचबरोबर पक्षातंर्गत विरोध शमवण्यात येडियुरप्पा यशस्वी ठरणार का? याकडेही राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 2:31 pm

Web Title: karnatak cm bs yediyurappa cm to be changed soon bjp mla basangouda p yatnal bmh 90
Next Stories
1 सरळ सरळ माफी का मागत नाहीत; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सवाल
2 पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार
3 जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X