News Flash

पतीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच घरावर रॉकेट हल्ला; इस्त्रायलमधील भारतीय महिलेचा मृत्यू

सौम्या गेल्या सात वर्षांपासून इस्त्रायलमध्ये होत्या

केरळमधील एका महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये महिलेने आपला जीव गमावला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय सौम्या व्हिडीओ कॉलवर पती संतोषसोबत बोलत असतानाच शहरावर रॉकेट हल्ला झाला. हे रॉकेट सौम्या यांच्या निवासस्थानावर कोसळलं आणि त्यांचं निधन झालं.

“माझ्या भावाला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच मोठा आवाज ऐकू आला. यानंतर अचानक व्हिडीओ कॉल कट झाला. आम्ही तात्काळ तेथील इतर आमच्या ओळखींच्या लोकांना फोन केले तेव्हा झालेल्या घटनेची माहिती मिळाली,” असं संतोष यांच्या भावाने पीटीआयला सांगितलं आहे.

इडुक्की जिल्ह्यातील किरीथोडू येथील रहिवासी असणाऱ्या सौम्या इस्त्रायलमध्ये गेल्या सात वर्षांपासून काम करत होते. सौम्या तिथे घरकाम करायच्या अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

नवनविर्वाचित आमदार आणि काँग्रेस नेते मनी कप्पन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 9:39 am

Web Title: kerala woman dies in israel after struck by rocket strike during video call with husband sgy 87
Next Stories
1 ‘धुरामुळे ग्रामस्थांना करोना होईल’; गावकऱ्यांनी कोविड मृतदेहावरील अंत्यसंस्कार रोखले
2 …म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना फटका बसतोय; ICMR ने सांगितलं कारण
3 करोनाच्या परिणामांचा अंदाज बांधण्यात सरकार अपयशी!
Just Now!
X