News Flash

बनावट कंपन्यांना डीडीसीएने दिले पैसे- किर्ती आझाद

पत्रकार परिषदेदरम्यान कीर्ती यांनी विकीलींक्स इंडियाचा व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला.

भाजप नेता आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी डीडीसीएतील भ्रष्टाचार उघड करणारा एक व्हिडीओ आज पत्रकार परिषदेत दाखविला. डीडीसीएतील घोटाळयांसंदर्भात त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन अनेक आरोप केले.
पत्रकार परिषदेदरम्यान कीर्ती यांनी विकीलींक्स इंडियाचा व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला. डीडीसीएशी संदर्भात १४ बनावट कंपन्या समोर आल्या आहेत. या कंपन्यांना कोटयावधी रुपये देण्यात आले पण त्यांचे काम सांगितलेले नाही . डीडीसीएचे सदस्य निविदांच्या किंमतीमध्ये फेरफार करायचे असे आरोप किर्ती आझाद यांनी केला. तसेच, डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या काही कंपन्यांना कंत्राट दिले, यामध्‍ये लोक तेच पण कंपनीचे नाव बदलले जात होते, अशी माहितीही कीर्ती यांनी दिली.
आझाद म्हणाले की, आमची लढाई व्यक्तिगत नसून, भ्रष्टाचाराविरुध्द आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा फॅन आहे, असेही म्हटले. या पत्रकार परिषदेला बिशन सिंग बेदीहे देखील उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 5:34 pm

Web Title: kirti azad ddca gave money to companies without verification
टॅग : Kirti Azad
Next Stories
1 स्पेनची मिरिया लालागूना रोयो बनली ‘मिस वर्ल्ड’
2 सेहवाग, गंभीरचा अरुण जेटलींना पाठिंबा
3 ‘त्या’ खासदाराचे सोनियांशी संगनमत- अरुण जेटली
Just Now!
X