कोकणी लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ व गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे अल्प आजाराने रविवारी पणजी येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

गेले काही दिवस आमोणकर यांच्यावर पणजीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २००९ साली आमोणकर यांना पद्मश्री किताबाने सन्मानित केले होते. शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक व भाषा चळवळीतील अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमोणकर यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात चार वेळा कर्करोगाशी यशस्वी लढा दिला होता.

आमोणकर यांचे शिक्षण मुंबईतील विल्सन महाविद्यालयात झाले होते. नंतर १९५६ ते १९६० या कालावधीत त्यांनी केनियाची राजधानी मोंबासातील गोवन स्कूलमध्ये अध्यापन केले. ‘धम्मपद’ या बौद्धांच्या धर्मग्रंथाचा कोकणीत अनुवाद करण्यासाठी ते पाली भाषा शिकले होते. ज्ञानश्वरी, भगवद्गीता, ‘गॉस्पेल ऑफ जॉन’ या महत्त्वाच्या धार्मिक पुस्तकांचे त्यांनी कोकणीत प्रवाही अनुवाद केले. अलीकडेच त्यांनी शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सीझर’ या नाटकाचा कोकणीत अनुवाद केला होता. शेक्सपियरच्या विविध नाटकांमधील प्रसिद्ध  संवाद व म्हणी यांचे संकलन असलेल्या कोकणीतील अनुवादित पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले होते.

वर्षभरापूर्वीच आमोणकर यांची गोवा कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली होती. साहित्य अकादमी पुरस्कार व ‘पद्मश्री’ किताबासह त्यांना ज्ञानपीठकार रवींद्र केळकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.