देशात सध्या विकासाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मात्र याच शब्दाचा आधार घेत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर ताशेरे झाडले आहेत. ‘जो पैदाही हुआ नहीं वो मरेगा क्या? इसलिए किसका RIP?’ असा ट्विट करत लालूप्रसाद यादव यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणा दौऱ्यावर असतानाच त्यांनी हा ट्विट करून टीका केली. ‘एनडीटीव्ही’ने या संदर्भातील बातमी दिली आहे.

एका ट्विटर युजरने भाजपविरोधात लालूप्रसाद यादव यांनी सुरू केलेला हॅशटॅग रिट्विट करण्याची विनंती केली होती. हाच हॅशटॅग रिट्विट करत लालूप्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लालूप्रसाद यादव यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार या सगळ्यांवर निशाणा साधला आहे. नुकताच समोर आलेल्या जय शहा प्रकरणावरही लालूप्रसाद यादव यांनी ट्विट करून टीका केली आहे. तसेच ‘सीबीआय, अंमलबजावणी संचलनालय, प्राप्तिकर विभाग आणि माध्यमं सरकारसोबत आहे असे कोणी म्हटले तर खबरदार!’ असेही ट्विट लालूप्रसाद यादव यांनी केले.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”hi” dir=”ltr”>विकास से जय हो। विकास करवाने मे बाप की 300 तो बेटे की 16000गुणा हिस्सेदारी रही<br><br>ख़बरदार! कोई बोला तो उनके पास IT/CBI/ED और समर्थित मीडिया है</p>&mdash; Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) <a href=”https://twitter.com/laluprasadrjd/status/917258620173033472?ref_src=twsrc%5Etfw”>October 9, 2017</a></blockquote>
<script async src=”//platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>