लॉकडाउनचा चौथा टप्पा उद्या, रविवारी ३१ मे रोजी संपत आहे. लवकरच लॉकडाउनबाबतचा निर्णय सरकारडून जाहीर करण्यात येत आहे. ३१ जुलै रोजी होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात नरेंद्र मोदी लॉकडाउन संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या दोन्ही समित्यांनी देशात लॉकडाउन आणखी वाढवू नये, अशी सुचना केली आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या रेड झोन किंवा हॉटस्पॉट असलेल्या शहरात लॉकडाउन आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.

‘दी हिंदू’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील १३ प्रमुख शहरामध्ये लॉकडाउनचा पाचवा टप्पा घेतला जाणार आहे. या शहरात लॉकडाउन आणखी कडक होऊ शकतो. या १३ शहरांमध्ये देशातील ७० टक्के करोनाग्रस्त रुग्ण आहेत. एक जून पासून हॉटस्पॉट शहरं सोडून लॉकडाउन आणखी शिथिल होऊ शकते. त्या ठिकाणाची परिस्थिती पाहून हॉटेल, मॉल्स आणि रेस्तॉरन्टही उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तर हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील निर्बंध आत्तापेक्षाही कठोर करण्यात येतील

३१ मे रोजी चौथ्या टप्प्याचा कालावधी संपत आहे. त्यामुळे केंद्राकडून लवकरच नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात. देशात लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढवणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र, हे निर्बंध मोजक्या शहरांपुरते मर्यादित असतील असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

या शहरांमध्ये कायम राहू शकतो लॉकडाउन –
मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरम यांचा समावेश आहे.

राज्याकडेही आधिकार –
राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये लॉकडाउन वाढवण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

दरम्यान शुक्रवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लॉकडानच्या संभाव्य मुदतवाढीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली असल्याने १ जूनपासून लॉकडानचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.