News Flash

अकरावीच्या विद्यार्थ्यासह पळून गेल्या मॅडम; दररोज रोज चार तास घ्यायच्या शिकवणी

हरियाणाच्या पानिपत शहरातून शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: पीटीआयवरुन साभार)

हरियाणाच्या पानिपत शहरातून शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका खासगी शाळेची शिक्षिका १७ वर्षाच्या विद्यार्थ्यासह पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पानीपतच्या देशराज कॉलनीतील एका खासगी शाळेत शिकवणारी ही शिक्षिका घटस्फोटीत असून ती आपल्या माहेरी राहत होती. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी जिल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वडिलांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे २९ मे रोजी दुपारी दोन वाजता शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी गेला होता. परंतु त्यानंतर तो परत आला नाही. शिक्षिकेच्या कुटुंबाने प्रथम याबाब वक्तव्य करण्याचे टाळले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या बेपत्ता होण्याविषयी माहिती दिली.

याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापपर्यंत या दोघांचा कुठेही शोध लागला नाही. ते गायब झाल्यापासून त्यांचे दोन्ही मोबाइल फोन बंद आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले आहे की, त्यांचा मुलगा ११ व्या वर्गात असून पळून गेलेली महिला त्याची वर्गशिक्षिका आहे.

हेही वाचा – ती मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही, तर…; चोक्सीच्या वकिलांनी केला धक्कादायक दावा

गेल्या दोन वर्षांपासून हा अल्पवयीन विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात असे. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी दररोज चार-चार तासांच्या शिकवणीसाठी शिक्षिकेच्या घरी जात असे. २९ मे रोजी दोघेही अचानक गायब झाले. विशेष म्हणजे दोघांनीही घरातून कोणत्याही वस्तू नेल्या नाहीत. मौल्यवान वस्तूंपैकी शिक्षिकेच्या हातात फक्त सोन्याची अंगठी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 4:11 pm

Web Title: madam who fled with a student of class xi in haryana srk 94
Next Stories
1 करोनाशी लढण्यासाठी भारताच्या भात्यात अजून एक अस्त्र! लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता!
2 राजकीय संघर्ष पेटला! तीन दिवसांत उत्तर द्या; केंद्राचा बंडोपाध्याय यांना इशारा
3 सर्वोच्च न्यायालय : न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “देवाकडे प्रार्थना करतो की…”
Just Now!
X