आपल्याकडे देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण प्रचलित आहे. चीनमधील ग्वांगदांग प्रांतात मात्र या म्हणीचा साक्षात प्रत्यय आल्याचे पहायला मिळाले. ग्वांगदांग प्रांतामधील झोंगशान शहरात जबरदस्त वादळ आले होते, त्यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या घरातील बाळ घाबरून आपल्या शोधण्यासाठी एक बाळ घराच्या खिडकीवर चढले. आपल्या आईच्या शोधात असणाऱ्या या बाळाचा खिडकीच्या अगदी कडेला आल्यामुळे तोल गेला. मात्र, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावरून खाली पडण्याअगोदरच बाळाला अलगद झेलले.
चीनमधील एका टिव्ही चॅनलला योगायोगाने या संपूर्ण थरारक घटनेचे चित्रण करण्यात यश मिळाले. या टिव्ही चॅनलने प्रसारित केलेल्या चित्रफीतीमध्ये कशाप्रकारे मुलगा पडत आहे आणि दोन व्यक्ती त्याला पडकण्यासाठी धावत आहेत. अखेर एक व्यक्ती त्याला यशस्वीरित्या पकडते अशा संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रण पहायला मिळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
व्हिडिओ: देव तारी त्याला…
आपल्याकडे देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण प्रचलित आहे. चीनमधील ग्वांगदांग प्रांतात मात्र या म्हणीचा साक्षात प्रत्यय आल्याचे पहायला मिळाले.
First published on: 24-05-2014 at 04:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man catches baby falling from second story window in china