एका व्यक्तीनं झोपेत असलेल्या आपल्या २५ वर्षीय पत्नीला सर्पदंश करून हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. महिन्याभराच्या कालावधीत दोन वेळा त्या महिलेला सापानं दंश केला होता. त्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या पतीवर संशय होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर यातून धक्कादायक माहिती समोर आली. एका व्यक्तीनं सर्पदंश करून आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांन पथनमथिट्टा जिल्हातील अदूर येथे एका खासगी बँकेत कामाला असलेल्या महिलेचा पती सूरज या व्यक्तीला तसंच त्याला कोब्रा आणि रसेल व्हायपर साप आणून देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. हे दोन्ही साप खूप विषारी असतात.

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना संपर्क केला होता. तसंच महिन्याभरापूर्वी आपल्या मुलीला सापानं दंश केला होता, परंतु त्यातून ती बचावली होती. त्यानंतर पुन्हा सर्पदंश झाल्यानं तिचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्याला तिच्या पतीवर संशय होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्या दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. तसंच यामागे तिच्या पतीला पैसे हवे असल्याचं कारण समोर आलं आहे आणि हे धक्कादायक आहे, असं पोलिसांनी सांगितलं. लग्नात सूरजला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने देण्यात आले होते असंही पोलिसांनी सांगितलं.