News Flash

उत्तर प्रदेशातील रुग्णालयात करोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

२५०० रुपयात करोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची रुग्णालयाची ऑफर

संग्रहित

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका खासगी रुग्णालयात पैसे घेऊन कर्मचारी करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर हे हॉस्पिटल सील करण्यात आलं असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. इंडिया टीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

दरम्यान रुग्णालयाचे मालक शाह आलम यांनी आरोप फेटाळला असून आपली बदनामी करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा दावा केला आहे. आपण निर्दोष असून तपासात हे निषप्न्न होईल असं त्यांनी म्हटलं आहे. मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. तसंच पोलीस ठाण्यात एफआआयर दाखल करण्याचाही आदेश दिला होता. राजकुमार सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने दिलेल्या निगेटिव्ह रिपोर्टदेखील आपल्याकडे असून त्यावर प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचा शिक्का आहे.

दरम्यान याप्रकरणी मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला असून आम्ही तपास करत असल्याची माहिती मेरठचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणलाही अटक करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 8:27 am

Web Title: meerut hospital offers negative covid result for 2500 rupees sgy 87
Next Stories
1 आता चीन म्हणतं, “भूतानमधील तो अभयारण्याचा प्रदेशही आमचाच”
2 ठरलं! भाजपाच्या ‘या’ नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला
3 एक पाऊल पुढे..! तृतीयपंथींना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आधिकारी होण्याची संधी
Just Now!
X