आसियान देशांनी वादग्रस्त दक्षिण चीन महारासागरात चीनच्या वाढत असलेल्या आक्रमतकतेविरोधात कारवाई करावी, असं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी व्यक्त केलं. तसंच यासाठी अमेरिकेना आसियाई देशांना समर्थन देईल, असं आश्वासनही पॉम्पिओ यांनी यावेळी दिलं.

गुरूवारी पॉम्पिओ यांनी आसियान राष्ट्रांच्या वार्षिक संमेलनात त्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. फिलिपिन्स. व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेई हे या संघटनेतील देश आहेत. तसंच दक्षिण चीन महासागरावरून गेल्या अनेक काळापासून या देशांचे चीनशी वाद सुरू आहेत. दरम्यान, दक्षिण चीन महासागरावर चीन आपला दावा करत आला आहे.

पीटीआयच्या एका वृत्तानुसार अमेरिका दक्षिण चीन महासागरावर कोणताही दावा करत नसला तरी ट्रम्प प्रशासनानं नुकाताच दक्षिण चीन महासागरातील चीनच्या तळ उभारणीसाठी जबाबदार असलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले होतं. यामध्ये हवाई क्षेत्र निर्माण करणं, कोरल रीफवर तयार करण्यात आलेल्या बेटांवर रडार आणि क्षेपणास्त्र केंद्र उभारणं यांचा समावेश आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातही चीनचा हस्तक्षेप यामुळे वाढू शकतो अशी भीतीही वर्तवण्यात आली होती.

“या नव्या विचारांद्वारे पुढे जात राहा. केवळ कारवाई करावी यावर चर्चा करू नका,” असं पॉम्पिओ यांनी दहा राष्ट्रांच्या संघटनेशी बोलताना सांगतिलं. परंतु या वादाचा शांततामय वातावरणातूच मार्ग काढला जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्यानं सांदितंल. “चिनच्या कम्युनिस्ट पक्षाला आपल्यापेक्षा वरचढ होऊ देऊ नका. आपल्यात आत्मविश्वास अशला पाहिजे आणि अमेरिका आपल्या मित्रांच्या मदतीसाठी या ठिकाणी आहे. चीन सार्वभौमत्व, क्षेत्रिय अखंडतेचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान करत नाही,” असंही पॉम्पिओ म्हणाले. ज्या कंपन्यांनी वादग्रस्त क्षेत्रात बेटांच्या निर्मितीचं काम केलं त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं.