अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी शनिवारी एक ट्विट करत मला माझी मशीद परत हवी असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ओवेसी यांनी हे ट्विट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं होतं. त्यानंतर आता ट्विटरवर ‘ओवेसी भारत छोडो’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

काही ट्विटर यूजर्सनी ओवेसींना थेट १६ व्या शतकात जा असं ठणकावलं आहे. कारण आत्ताचा भारत हा मोगलाईच्या काळातील भारत नाही असंही त्यांना सुनावलं आहे. तर याच प्रतिक्रियेवर एकाने प्रतिक्रिया देत ओवेसींना जास्त मागे पाठवू नका कारण १२ व्या शतकात वगैरे पाठवलंत तर तिथे राम मंदिरच मिळेल असंही खोचक वाक्य लिहिलं आहे.

काही युझर्सनं ओवेसी यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही, असा सवाल केला आहे. तर काही जणांनी ओवेसी यांनी देश सोडला पाहिजे यावर आपण सहमत असल्याचं म्हटलं आहे. तर एका युझरनं मुघलांनी हिंदूंची तोडलेली मंदिरं आपल्याला परत हवी आहेत, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.