News Flash

दिग्गज राजकारण्यांचे श्रद्धास्थान असलेल्या माँ बगलामुखी देवीचे राज ठाकरेंनी घेतले दर्शन

श्री पितांबरा पीठाला भेट

मनसे प्रमुख राज ठाकरे. (संग्रहित)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील दिग्गज राजकारण्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मध्य प्रदेशातील दतिया येथील माँ बगलामुखी देवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे विविध क्षेत्रात तसेच राजकारणात अपयश आलेले लोक या देवीचे दर्शन घेऊन यश प्राप्त करतात, अशी अख्यायिका सांगितली जाते.

राज्यातील विधानसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे मनसेची वाटचाल जोरात सुरू झाली होती. राज यांच्या सभेला लाखोंची गर्दी होत होती. सुरुवातीला मतेही मिळत गेली. पण पक्षबांधणीकडे म्हणावे तेवढे लक्ष देता आले नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे मनसेच्या नेत्यांना वाटते. सातत्याने पराभवाला सामोरे जाणाऱ्या मनसेला फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेण्यासाठी पक्षबांधणी आणि पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्या दिशेने वाटचालही सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच आता राज ठाकरे यांनी देशभरातील राजकारण्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मध्य प्रदेशातील बगलामुखी देवीचे दर्शन घेतले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर प्रचाराला सुरूवात केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनाही भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशाच प्रकारचे यश मिळेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:58 pm

Web Title: mns chief raj thackeray datia madhya pradesh baglamukhi temple pitambara peeth to seek blessings
Next Stories
1 ‘तेजस’नंतर येतेय ‘उदय एक्स्प्रेस’, जाणून घ्या वैशिष्ट्ये
2 पश्चिम बंगालचे बारावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात
3 मच्छर हे दहशतवाद्यांसारखेच, त्यांना मारणे ही देशभक्तीच: भाजप मंत्री
Just Now!
X