रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप केले. मोहन भागवतांनी दंगली कशा भडकवायच्या त्याचे प्रशिक्षण दिले असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

मोहन भागवत नुकतेच १४ दिवसांसाठी बिहारमध्ये आले होते. या १४ दिवसात रामनवमीला दंगली कशा भडकवायच्या त्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. आता लोकांना त्यांच्या बिहार भेटीचा उद्देश लक्षात येत आहे असे तेजस्वी यादव म्हणाले.

मागच्या काही दिवसात बिहारमध्ये जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. मागच्या आठवडयात बिहारमध्ये दंगेखोरांनी २० पेक्षा जास्त दुकाने पेटवून दिली. रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर दगडफेक केली त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.