News Flash

खासदार विनय सहस्रबुद्धे यांना करोना संसर्ग

स्वत: ट्वीटद्वारे दिली माहिती

(संग्रहित छायाचित्र)

भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांना करोनाची लागण झाली आहे. सहस्रबुद्धे यांनी स्वत: ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. गेल्या शुक्रवारी आपण चाचणी करून घेतली ती नकारात्मक आली, मात्र बुधवारी रात्री डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आणि अंगात सौम्य तापही होता. त्यामुळे आपण करोनाची चाचणी केली असता ती सकारात्मक आली, असे त्यांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:16 am

Web Title: mp vinay sahasrabuddhe infected with corona abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नव वर्षांरंभी करोनावरील लस अपेक्षित
2 जम्मू काश्मीर: पाण्याच्या टाकीत सापडली ५२ किलो स्फोटकं; पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली
3 “मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा
Just Now!
X