भारतीय राजदूत रणजित राय यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे वृत्त निराधार असून द्विपक्षीय संबंध बिघडवण्याच्या हेतूने पसरवले आहे असा खुलासा नेपाळने केला आहे.

अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांची पहिली भारत भेट रद्द करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर नेपाळमधील राजदूत राय यांची हकालपट्टी होणार अशी चर्चा होती.

नेपाळचे भारतातील दूत दीप कुमार उपाध्याय यांना तेथील सरकारने माघारी बोलावल्याच्या वादाची पाश्र्वभूमीही याला आहे. नेपाळमधील भारतीय दूत राय यांची राजनैतिक सुरक्षा काढून घेतली जाणार असल्याचीही चर्चा होती.

नेपाळ सरकारने म्हटले आहे की, भारतीय दूतांच्या हकालपट्टीच्या वृत्तास काही आधार नाही. प्रसारमाध्यमांनी भारतीय दूत राय यांच्या हकालपट्टीच्या वावडय़ा उठवल्या असून त्यामुळे भारत-नेपाळ संबंध खराब करण्याचा हेतू आहे असे उनेपाळ सरकारने म्हटले आहे की, भारतीय दूतांच्या हकालपट्टीच्या वृत्तास काही आधार नाही.पपंतप्रधान व परराष्ट्र कमाल थापा यांनी सांगितले.

नेपाळचे भारतातील राजदूत उपाध्याय यांना त्यांच्या सरकारने माघारी बोलावले असले तरी ते अजून भारतातच आहेत व नेपाळमधील के. पी. ओली सरकार पाडण्यासाठी भारताशी संगनमत केल्याचा आरोप उपाध्याय यांनी फेटाळला आहे.

नेपाळने शुक्रवारी अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द केला होता. दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले नसले तरी नेपाळमधील अंतर्गत कारभारात भारताने लुडबूड केल्याच्या नाराजीमुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.