03 December 2020

News Flash

‘ट्राय’चा नेट न्युट्रँलिटीला पाठिंबा; इंटरनेटच्या भिन्न सेवांसाठी एकच दर

फेसबुकडून विकसनशील देशांसाठी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ सेवेची घोषणा करण्यात आली होती

काही दिवसांपूर्वी फेसबुकडून विकसनशील देशांसाठी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ सेवेची घोषणा करण्यात आली होती.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ‘ट्राय’ने सोमवारी इंटरनेट सेवांसाठी वेगवेगळे दर आकारण्याच्या विरोधात कौल देत नेट न्युट्रॅलिटीवर शिक्कामोर्तब केले. ट्रायच्या या निर्णयामुळे फेसबुकच्या ‘फ्री बेसिक सेवा’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कोणत्याही सेवा पुरवठादार इंटरनेटसाठी वेगवेगळे दर आकारले जाण्याची शक्यता निकालात निघाली आहे. सेवा पुरवठादार केवळ आपातकालीन परिस्थितीच इंटरनेटचे दर कमी करू शकतात, असे ट्रायने म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या इंटरनेट पुरवठाराला प्रतिदिवशी ५० हजारांचा दंड आकारण्यात येईल, असेही ट्रायने म्हटले आहे. काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या खास ऑफर देतात. मात्र, ट्रायने यावरही बंदी आणली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकडून विकसनशील देशांसाठी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ सेवेची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही संकेतस्थळांना इंटरनेटचे पैसे न मोजताही भेट देणे शक्य होणार होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 6:13 pm

Web Title: net neutrality trai rules against differential pricing for internet services
Next Stories
1 उर्दूतील प्रख्यात कवी निदा फाजली यांचे निधन
2 विकासाचे आणि तिरस्काराचे धोरण एकत्रितपणे राबवणे शक्य नाही- शशी थरूर
3 बंगळुरूतील शाळेत बिबट्याचा धुमाकूळ
Just Now!
X