भारताने मॉरिशसला प्रथमच युद्धनौका निर्यात केली आहे.  भारताने प्रथमच संरक्षणात निर्यातीचे क्षेत्र ओलांडले आहे.
भारत काही युद्धनौकांची निर्यात करणार असून त्यातील ही पहिली युद्धनौका आहे. ती गार्डन रीच शीपबिल्डर्स अँड इंजिनीयर्स लिमिटेड या कोलकात्याच्या सार्वजनिक कंपनीने तयार केली आहे. तिची किंमत ५४.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर असून तिची लांबी ७४.१० मीटर आहे.