दिल्लीत सात वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. एका तरूणीवर अत्यंत क्रूरपणे सामुहिक बलात्कार करण्यात आला. या बहुचर्चित निर्भया प्रकरणातील पिडितेला अखेर सात वर्षांनंतर न्याय मिळाला. २० मार्च २०२० ला सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधी अखेरच्या टप्प्यात दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. दोषींनी रडारड करून आणि लादीवर लोळून बचावाचा प्रयत्न केला, पण या चौघांना अखेर सकाळी साडे पाचच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले. पवन या जल्लादाने या चौघांना फासावर लटकवण्याची औपचारिकता पूर्ण केली.

निर्भयाच्या दोषींना फाशी देणारा जल्लाद म्हणतो, या कमाईतून करणार मुलीचं लग्न

जागरणच्या वृत्तानुसार पवन या जल्लादाने या फाशीच्या अनुभवाबाबत सांगितले की फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला पहाटे उठवण्यात आले. उठल्यानंतर नित्याचे विधी आटोपून झाल्यावर पवन यांना नाश्त्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी पवन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की आधी त्या दोषींना फासावर लटकवतो, मगच खाण्यापिण्याचं बघू. पवन जल्लादने सकाळी साडे पाचच्या सुमारास आधी दोघांना आणि नंतर दोघांना असं चौघांना फासावर लटकवले.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

‘त्या’ संध्याकाळी निर्भयासोबत असलेला तो मित्र सध्या काय करतो?

जल्लाद असलेल्या पवन यांनी त्या चार दोषींना फासावर लटकवल्यानंतर त्यांना फार समाधान वाटले. पण त्यांना वाटलेले समाधान हे केवळ क्रूर दोषींना फासावर लटकवल्याचे नव्हते, तर त्यांच्या मुलीच्या लग्नासंबंधी गोष्टीचेही होते. जागरणच्या वृत्तानुसार या चार दोषींना फाशी देऊन झाल्यावर या कामाचे जे मानधन म्हणून पैसे मिळणार आहेत, त्या पैशातून पवन हे आपल्या मुलीचे लग्न करणार आहेत. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या चार दोषींनी फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी पवन यांना खूप आनंद झाला होता. या कामाचे जे पैसे मिळतील त्यातून मी माझ्या नैतिक जबाबदाऱ्या पार पाडेन. माझ्या मुलींची लग्न आणि काही कर्जे फेडता येतील, असे पवन म्हणाले होते.

“एकाच वेळी चार जणांना फाशी देण्याची माझी ही पहिलीच वेळ असणार आहे. त्या मोबदल्यात मला लाखभर रूपयांचे मानधन नक्की मिळेल. एकाच वेळी लाखभर रूपये बघण्याचीही माझी पहिलीच वेळ असेल. या फाशीची अंमलबजावणी केल्यानंतर मिळालेल्या पैशातून मी माझ्या मुलीचं लग्न करून देईन”, असे ५७ वर्षाच्या पवन यांनी स्पष्ट केले.