24 November 2020

News Flash

नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला – चिराग पासवान

केवळ जागा वाटपाच्या मुद्यावरूनच जदयूशी फारकत घेतलेली नाही, असे देखील म्हणाले.

प्रतिकात्मक छायाचित्र

लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, नितीश कुमार यांनी रामविलास पासवान यांचा अपमान केला होता असा देखील त्यांनी आरोप केला आहे. चिराग पासवान यांनी यावेळी स्पष्ट केले की, केवळ जागा वाटपाच्या मुद्यावरूनच जदयूशी त्यांनी फारकत घेतलेली नाही. चिराग यांचे म्हणने आहे की, त्यांचा पक्ष जदयूच्या राजकारणाचा विरोध करत आलेला आहे.

चिराग पासवान म्हणाले, मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जदयू बरोबर आघाडी होती. कारण, जदयू एनडीए आघाडीत परतली होती. तर, चिराग यांनी हा देखील आरोप केला आहे की, लोकसभा निवडणुकीत जदयूने लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले. जे की आघाडीच्या धर्माचे उल्लंघन होते. चिराग पासवान यांनी अधिक विस्तृतपणे बोलताना सांगितले की, मागील वर्षी त्यांच्या वडिलांनी राज्यसभेचे नामांकन दाखल करते वेळी नितीश कुमार यांना सोबत यावं असं म्हटलं होतं. मात्र, नितीश कुमार हे अहंकाराने वागले व ठरलेल्या वेळेच्या नंतर आले. कोणताही मुलगा ही गोष्ट विसरणार नाही.

चिराग पासवान म्हणाले की, अशातच नितीश कुमार यांनी म्हटले होते की जदयूच्या पाठिंब्याशिवाय रामविलास पासवान राज्यसभेत जाऊ शकत नव्हते, कारण आमचे केवळ दोन आमदार होते. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं होतं की, माझ्या वडिलांना राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः दिले होते.

लोक जनशक्ती पार्टी कधीच नितीश कुमार यांच्या राजकारणाची प्रशंसक राहिलेली नाही. दलितांना सर्व गटांमध्ये वाटून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दलितांचे खूप नुकसान केले आहे. असे देखील चिराग पासवान यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 10:05 pm

Web Title: nitish kumar insulted my father chirag paswan msr 87
Next Stories
1 माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक; काँग्रेस आक्रमक
2 जम्मू-काश्मीरमध्ये विरोधकांची नवी आघाडी; फारुख अब्दुल्ला यांनी केली घोषणा
3 भारतीय सैन्याने पाकिस्तानचे घुसखोरीचे डाव उधळून लावले – लष्करप्रमुख
Just Now!
X