19 September 2019

News Flash

नितीश कुमारांचा काँग्रेसला पाठिंबा

राजकारणात कुठल्याही प्रकारचा वैरभाव नको.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (संग्रहित छायाचित्र)

राजकारणात बदल्याची भावना ठेवली जाऊ नये, तसेच विरोधी पक्षांची छळणूक करू नये, असे सांगून नॅशनल हेराल्ड मुद्दय़ावर काँग्रेस करत असलेल्या निषेधाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाठिंबा दिला आहे.

राजकारणात कुठल्याही प्रकारचा वैरभाव नको. लोकशाही पद्धतीत लोकांसाठी काम करण्याचा जनादेश दिला जातो. याचा विरोधकांना सतावण्यासाठी वापर होऊ नये, असे कुमार संसदेबाहेर बोलताना म्हणाले.सरकार अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर करत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपांबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

First Published on December 11, 2015 2:33 am

Web Title: nitish kumar support congress
टॅग Nitish Kumar