अनेकवेळा उशिर झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे प्रवाशांना गडबडीत विनातिकिट प्रवास करावा लागतो. अशावेळी जर टीसीने पकडले तर मोठा दंड ही भरावा लागत असत. परंतु अशा प्रवाशांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खूशखबर दिली आहे. रेल्वेमधून जर तुम्ही विनातिकिट प्रवास करात असाल तर दंड भरण्याऐवजी तुम्हाला धावत्या रेल्वेतच तिकिट काढण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार आहे.
अनेकवेळा प्रवासी विनातिकिट रेल्वेतून प्रवास करतात. तपासणीवेळी जर हे प्रवासी सापडले तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जात. आता दंड भरण्याऐवजी टीसी तुम्हाला तिकिट देतील शिवाय रेल्वेत सीट उपलब्ध असेल तर तेही दिले जाईल. या सुविधेमुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. यासाठी टीसीनांच तिकिट देण्यासाठी छोटंस मशीन देण्यात येईल. प्रारंभी ही सुविधा लखनऊ मेल, गरीब रथ, अर्चना सुपरफास्ट, राजधानी सुपरफास्ट या रेल्वेतून देण्यात येईल.
जर एखादा प्रवासी विनातिकिट रेल्वेत असेल तर त्याला टीसींशी संपर्क साधून तिकिट घ्यावे लागेल. तसेच प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना टीसी रेल्वेतच जागा मिळवून देतील. या छोट्या मशीनमध्ये रेल्वेतील सध्याची आसन व्यवस्था, कोणता प्रवासी कोठे उतरणार याची माहिती तसेच कोणते सीट रिकामे आहेत, याची माहिती समजेल. यामुळे प्रवाशांबरोबर रेल्वे प्रशासनाच्या उत्पनातही वाढ होईल, असे म्हटले जाते.