दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी यावेळी थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधत, भाजपला नरेंद्र मोदी काय, देव सुद्धा वाचवू शकत नाही असे म्हटले.
परदेशी विद्यापीठातील स्वयंसेवकांचा केजरीवालांच्या ‘आप’ला हात
भ्रष्टाचारमुक्त भारत हा महत्वाचा मुद्दा घेऊन दिल्ली विधानसभा निवडणूकीत उतरणारे अरविंद केजरीवाल दिल्लीतील महिला पत्रकार मंडळाने आयोजित केलेल्या प्रश्नोत्तर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवरून विरोधकांच्या प्रशासनीय दुखवट्यांची सालटी सोलली.
केजरीवाल म्हणाले, “भाजपला आता मोदी काय, देव सुद्धा वाचवू शकत नाही. त्यामुळे त्यांना आव्हान समजण्याची कोणतीही शक्यता नाही. काँग्रेसमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे दिल्लीत ‘आम आदमी’ला कमीतकमी ४७ जागांवर यश प्राप्त होईल” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘आम आदमी’नेही फुंकले रणशिंग
आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवत केजरीवाल म्हणाले, “अशा राजकारणामुळे देशाचे काही भले होणार नाही. याला राजकारण म्हणत नाहीत. लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल यांनी खरे राजकारण केले होते. असे राजकारण आता राहिले नाही.” असेही केजरीवाल म्हणाले.
आयएमसीसमवेत युतीमुळे केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात